विकास आणि विश्वासाला गुजराती जनतेचा पाठिंबा: फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

या निकालामुळे दिसून आले की देशातील जनता मोदींच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे. देशाला माहिती आहे, भाग्य बदलण्यासाठी आपल्याला मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. विकास आणि विश्वासाच्या राजकारणाला नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. 22 वर्षांनंतरही लोकांचा मोदींवर विश्वास आहे.

नागपूर - गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. नागरिकांनी विकास आणि विश्वासाला पाठिंबा दिला आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपने विजय मिळविला असून, मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा यश संपादन केले आहे. या विजयानंतर भाजपवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात येत आहे.

फडणवीस म्हणाले, की या निकालामुळे दिसून आले की देशातील जनता मोदींच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे. देशाला माहिती आहे, भाग्य बदलण्यासाठी आपल्याला मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. विकास आणि विश्वासाच्या राजकारणाला नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. 22 वर्षांनंतरही लोकांचा मोदींवर विश्वास आहे. गुजरात आणि हिमाचलमध्ये अभूतपूर्व विश्वास नागरिकांनी मोदींवर टाकला आहे. गुजरात आणि हिमाचलमधील नागरिकांचे अभिनंदन करतो. कोणीही काहीही विष पेरलं तरी त्यांना लोकांनी त्यांना मोठी चपराक दिली.

Web Title: Gujrat Verdict Gujrat Elections Devendra Fadnavis statement on Gujrat elections