मुंबईसह कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा; यंत्रणा सतर्क

एकीकडे राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Rain
Rain

मुंबई : एकीकडे राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई महापालिकेला (BMC) अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार मुंबई, मुंबई उपनगरासह कोकणामध्ये पुढील 2 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यातर्फे संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Orange Alert To Mumbai And Kokan Area )

हवमाना खात्यातर्फे (IMD) वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील घाटमाथ्यावर शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज सकाळापासूनदेखील मुंबई आणि परिसरात पावसाच्या सरी कोसळत असून, आता हवामानखात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील काही भागात पाणी तुंबल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून करण्यात आलेल्या नालेसफाईबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com