उद्धव ठाकरेंची सेटिंग कितीची?- किरीट सोमय्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मुंबई महापालिकेतील माफिया हे डम्पिंग ग्राऊंड बंद होऊ देत नाहीत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई : मुलुंडचे डम्पिंग ग्राऊंड बंद करणार नाही, असे सांगणारे उद्धव ठाकरे नंतर ते बंद करणार, असे सांगतात. उद्धव ठाकरे यांनी संबंधित आकृती बिल्डरशी किती कोटींची सेटिंग केली, असा सवाल खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुलुंड, गोवंडी, देवनार डंम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी अनेक जण काही वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयापासून केंद्र सरकारनेही याबाबत महापालिकेला निर्देश दिले आहेत. तरीही मुंबई महापालिकेतील माफिया हे डम्पिंग ग्राऊंड बंद होऊ देत नाहीत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात उद्धव यांच्या सांगण्यावरून खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना भवनात तातडीने पत्रकार परिषद घेतली.

किरीट सोमय्या मुलुंडचे डम्पिंग ग्राउंड हे बंद करू इच्छितात. कारण, त्यामुळे कोणा बिल्डरचा फायदा होणार असा, आरोप शेवाळे यांनी केला होता. उद्धव यांनी मुलुंड येथील सभेत डम्पिंग ग्राऊड बंद होऊ देणार नाही, असे जाहीर केले होते. आता ते बंद करण्यासाठी आकृती बिल्डरशी उद्धव यांनी किती कोटींची सेटिंग केली, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे. याबाबत त्यांनी पत्रकारांना ई-मेल पाठवला आहे.

महाराष्ट्र

सांगली - नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाकडून (एनएचबी) मिळणाऱ्या हरितगृह अनुदानासाठी गुजरात, मध्य प्रदेश ही राज्ये आणि विदर्भाचा अपवाद...

04.18 AM

मुंबई - श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला....

04.03 AM

मुंबई - सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष...

03.36 AM