बारावीच्या निकालाची तारीख निश्‍चित नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई - बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख अद्यापही ठरलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील खोट्या तारखांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने केले आहे. 

मुंबई - बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख अद्यापही ठरलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील खोट्या तारखांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने केले आहे. 

बारावीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा व्हॉट्‌सअप आणि फेसबुकवर पसरविण्यात येत आहेत. हे मंडळाच्या निदर्शनास आल्यानंतर बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत मंडळाने खुलासा केला आहे. काही प्रसारमाध्यमांमार्फत मंडळाचे बोधचिन्ह वापरून बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर होत आहेत. या माहितीवर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले. बारावीच्या निकालाची तारीख ठरल्यानंतर जाहीर केली जाईल, असेही मंडळाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 

Web Title: HSC results to date not fixed