नारायण राणेंचे महत्त्व फक्त प्रसारमाध्यमांत! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

पंढरपूर - माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना राजकारणात आता काहीच महत्त्व राहिले नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये त्यांना महत्त्व आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये शिवसेना- भाजपची सत्ता आहे, त्यामुळे कोकणातील राणेंची राजकीय महत्त्व आम्ही कमी केले आहे. आता प्रसारमाध्यमांनीच ठरवावे, राणेंचा प्रभाव कमी झाला की वाढला, अशी टीका गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी केली. 

केसरकर आज श्रीविठ्ठल दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. दर्शनानंतर श्री. केसरकर यांना नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाविषयी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. शेतकरी कर्जमाफीवर केसरकर म्हणाले, ""राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी सर्वच जण आग्रही आहेत. शिवसेनेनेदेखील तशी मागणी केली आहे. प्रसंगी सत्ता सोडण्याचीदेखील तयारी ठेवली आहे. आम्ही आमच्या मागणीवर आजही ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन दिले आहे, त्यामुळे आम्हीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत.'' 

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीविषयी केसरकर यांना विचारले असता, मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये लोकसंख्या वाढली आहे. इतर लहान शहरांच्या तुलनेत या मोठ्या शहरांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, अशी कबुली देत त्यांनी वाढत्या गुन्हेगारीचे खापर मात्र शहरातील वाढत्या लोकसंख्येवर फोडले आहे.