दोन दिवसांत शंभर एकरामधील पिक वाणुने केले फस्त

Insect destroy hundred acre of crops in aarni
Insect destroy hundred acre of crops in aarni

आर्णी : एक दिवस माझा येईल या आशेने शेतकरी जगतो आहे. उन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता शेतात बैलाप्रमाणे राब राब राबतोय. संपुर्ण उन्हाळ्याचे उन अंगावर झेलून निसर्गाच्या भरवशावर पावसाळ्यामध्ये शेतात खत, बि बियाण्यांची लागवड करतो. पोटच्या मुलासारखे तळहातावरील फोडाप्रमाणे पिकांचे रक्षण करतो. पिकावर येणाऱ्या रोगापासून बचाव करण्यासाठी विविध किटकनाशकांची फवारणी करतो. चांगले पिक व्हावे म्हणून जिवाचे रान करत असतांना जर निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. अशीच अवस्था झाली आहे. आर्णी तालुक्यातील साकुर या गावच्या शेतकऱ्यांची.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला अवकाळी का असेना पावसाने चांगली सुरुवात केली. 10 जुन पासुन चार दिवस रोज पाऊस आल्याने साकुरच्या शेतकऱ्यांनी शेतात खतासह बि बियाण्यांची लागवड केली. चार दिवसात शंभर एकराच्या वर शेतात बियाणांची लागवड झाली. त्यावर पुन्हा चांगला पाऊस आला. लावलेले बियाणे जमिनीवर येऊ लागले. त्यानंतर दोन तीन दिवसापासुन पाऊस येत नसल्यामुळे शेतात वाणु या अळ्या सारख्या किटीने शेतातील उभ्या पिकांच्या अंकुरावर अट्याक करून एका रोपट्यावर दहा ते पंधरा वाणुने खाऊन टाकले. यामध्ये दोन तीन दिवसात साकुर येथिल शंभर एकर च्यावर शेतजमिवर दुबारपेरणीचे संकट ओढवले आहे. अचानक आलेल्या या वाणु मूळे काही शेतकऱ्यांच्या जमिनी पडीत पडण्याची वेळ आली आहे. दोनच दिवसात वाणुने शेतकऱ्यांना उद्वस्त केले आहे.

दोन दिवसांत सतरा एकरामधील सोयाबीन वाणुने खाऊन टाकले

मी 13 तारखेला सतरा एकर जमीनीमध्ये सोयाबीन व तुरीची लागवड ट्रॅक्टरच्या साह्याने केली. त्यावर चांगला पाऊस झाला. बियाणेजमिनीवर आले. परंतु दोन दिवसांत संपूर्ण पिक वाणु या किटकाने खाऊन टाकले. अंकुरलेल्या बियांवर दहा ते पंधरा वाणु खातांना दिसले. त्यावर कोणत्याही औषधाचा फरक पडला नाही. सर्व जमिनीवर पुन्हा पेरणी करावी लागते. ही परिस्थिती आज आहे.असे मत साकुर चे शेतकरी मोरेश्वर पाटील शेतकरी यांनी व्यक्त केले. 

बारा वर्षांपूर्वी साकुरच्या शेतकऱ्यांना वाणुने हैराण केले होते. 

2005 मध्ये सुध्दा साकुरच्या शेतकऱ्यांवर असाच अट्याक केला होता. संपुर्ण शेतजमीन एका रात्रीच वाणुने फस्त केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला होता. तीच अवस्था या वर्षी सुद्धा झालेली आहे. दोनच दिवसात संपूर्ण शेतजमिमधील बियाणे वाणुने फस्त केले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट ओढवले आहे.  - बाबाराव चव्हाण, सरपंच साकुर....... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com