राजापूर आश्रमशाळेला "आयएसओ' नामांकन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

मुंबई - आश्रमशाळेत सुसज्ज ग्रंथालय, सर्व सुविधांनीयुक्‍त बहुमजली मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, डिजिटल क्‍लासरूम, स्वच्छ सुंदर परिसर, अभ्यासपूरक फ्लेक्‍स आणि रंगरंगोटी, बाग आणि पुरेसे खेळ साहित्य, विविध स्पर्धांचे आयोजन या निकषांवर तंतोतंत पात्र ठरल्यामुळे ठाणे विभाग आणि घोडेगाव प्रकल्पातील "आयएसओ' मानांकन राजापूर शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला मिळाले आहे. कामाचे निकष, सुखसुविधा, नावीन्यपूर्ण उपक्रम आदींच्या आधारे आदिवासी विकास विभाग प्रकल्पातील एकूण पाच जिल्ह्यांतील 31 आश्रम शाळांपैकी राजापूर (ता. आंबेगाव, पुणे) येथील आश्रमशाळेला हा मान मिळाला आहे. 

राजापूर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस. दोडके आणि त्यांच्या शिक्षकांनी केलेल्या नियोजनातून त्यांना ही यशप्राप्ती झाली आहे. त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे घोडेगाव प्रकल्पातील एकूण पाच जिल्ह्यांतील 31 आश्रमशाळांपैकी आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी डोंगराळ भागात असलेल्या राजपूर येथील शासकीय आश्रमशाळेला "आयएसओ' दर्जा प्राप्त झाला आहे. 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे पहिली "आयएसओ' मानांकन प्राप्त आश्रमशाळा आहे. राजापुरातील आश्रमशाळेला "यूनिसेफ'मार्फत जागतिक हात धुवादिनी स्वच्छ शाळा, सुंदर शाळा पुरस्कार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते देण्यात आला आहे. तसेच सलग तीन वर्षे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन राजपूर आश्रमशाळेमार्फत होते. राज्य शासनाच्या एका जाहिरातीत झळकण्याचा मानही राजापूर आश्रमशाळेला मिळाला आहे. 

प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक धोरण कार्यक्रमांतर्गत प्रगत शाळा व डिजिटल शाळा म्हणून पात्र ठरलेली ही आश्रमशाळा आहे. 2016 पासून सुरू झालेल्या शाळा सिद्धी मूल्यमापनातही या शाळेला अ श्रेणी प्राप्त झाली आहे.