राज्यात जलयुक्‍तनं बहरली "शिवारं..!' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई -राज्य सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना "जलयुक्‍त शिवार'च्या यशाचे आकडे समोर येत असून, या योजनेमुळेच राज्यातली शिवारं बहरल्याचा दावा राज्य सरकारने केला. जलयुक्‍तच्या 3 लाख 35 हजार 785 कामांमुळे यंदा सर्वच पिकाच्या उत्पादनात दिड ते दुप्पट वाढ झाल्याचा दाखला दिला जात आहे. सलग चार वर्षाच्या दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला गतवर्षीच्या मान्सूनने तारले असले तरी जलयुक्‍तच्या कामांमुळे साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे महाराष्ट्र "टॅंकरमुक्‍त' होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

गेल्या वर्षी जलयुक्‍त शिवार या अभिनव संकल्पनेवर आधारीत सरकारने राज्यभरात मोहीम हाती घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेवरच सर्वस्वी जोर दिला होता. पहिल्या टप्प्यात 11 हजार 494 गावांत जलयुक्‍त शिवार अभियान राबविण्यात आले. त्यामधून विविध प्रकारची 3 लाख 35 हजार 785 कामे उभी राहीली. यापैकी 8671 कामे लोकसहभागाने केली. एकूण कामांवर 4954 कोटी रूपयांचा खर्च झाला. तर, श्रमदानातून 538 कोटी रूपयांची कामे उभी राहीली. 

जलयुक्‍तची झालेली कामे व उत्तम प्रकारचा पाऊस यामुळे अनेक शिवारात भूगर्भातील पाण्याची पातळी थेट 1 ते 3 मीटरपर्यंत वाढल्याची आकडेवारी सरकारने दिली. राज्याच्या कृषी उत्पादनात कमालीची घट होत असताना, यंदाच्या वर्षी जलयुक्‍त शिवार अभियानामुळे विविध पीक उत्पादनात भरघोस वाढ झाली. दरहेक्‍टरी उत्पादनात झालेल्या या वाढीमुळे महाराष्ट्राचे कृषी उत्पादन वाढल्याचे समोर आले आहे. यात धान्य पिकांमध्ये दिडपट, डाळवर्गीय पीकांमध्ये दुप्पट तर तेलबियात दुप्पट वाढ झाल्याची आकडेवारी सरकारने दिली आहे. 

Web Title: jalyukta shivar yojna