तुझ्या मंदिरात बलात्कार झाला तेव्हा कुठे होतास तु? - जितेंद्र आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न विचारणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

कठुआ आणि उन्नाव येथील प्रकरणाने देश पुन्हा एकदा हादरुन गेला. जम्मू कश्मीरमधील कठुआ येथे 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तर उन्नावमध्ये एका तरुणीवरही सामूहीक बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपाचा आमदार कुलदीप सिंह सेनगरला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांवर देशातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना  याच प्रतिक्रियांपैकी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न विचारणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

'हे देवा तु कुठे आहेस? हरवलायस की गेला कंटाळून? कश्मीरमधल्या कठुआमध्ये तुझ्या मंदीरात आठ दिवस माझ्या मुलीवरती, या देशाच्या मुलीवरती बलात्कार झाला....देवा तिची चूक काय? देव आहे की नाही हा प्रश्न पडतोय रे मला देवा?' असा राग व्यक्त करत आव्हाड यांनी भाजप सरकारचा उल्लेख न करता त्यांच्यावर टिका केली आहे. 'लोकशाहीचे रक्षक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो तेच बलात्कार करताहेत...' अशी बोचरी टिका करत उन्नाव मधील बलात्कारासंदर्भातही आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Jitendra Awhad Questioning to God On Kathua And Unnao Rape Case