कराड-चिपळूण लोहमार्ग पाच वर्षांत पूर्ण करू - प्रभू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

मुंबई - चिपळूण-कराड नव्या लोहमार्गामुळे पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दरी दूर होईल. हा दिवस स्वप्नपूर्ती, शब्दपूर्ती आणि कर्तव्यपूर्तीचा आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. 103 किलोमीटरच्या या लोहमार्गाची उभारणी पाच वर्षांत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. 

मुंबई - चिपळूण-कराड नव्या लोहमार्गामुळे पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दरी दूर होईल. हा दिवस स्वप्नपूर्ती, शब्दपूर्ती आणि कर्तव्यपूर्तीचा आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. 103 किलोमीटरच्या या लोहमार्गाची उभारणी पाच वर्षांत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. 

"पीपीपी‘ (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर चिपळूण-कराड लोहमार्ग उभारला जाईल. अशा प्रकारचा देशातील हा पहिलाच रेल्वे प्रकल्प आहे. सह्याद्री अतिथिगृहावर रविवारी (ता. 14) सकाळी कोकण रेल्वेचे व्यवस्थाकीय संचालक संजय गुप्ता आणि शापूरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एस. मुकुंदन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते उपस्थित होते. सुमारे 3195 कोटींचा हा लोहमार्ग पाच वर्षांत पूर्ण होईल. या "पीपीपी‘ प्रकल्पात कोकण रेल्वेची 26 टक्के; तर शापूरजी पालनजी कंपनीची 74 टक्के भागीदारी आहे, असे गीते म्हणाले. 

काळजी वाटते - चव्हाण 

या प्रकल्पाला आपला थेट विरोध नाही, त्यासाठी आपला नेहमीच आग्रह राहिला आहे; मात्र देशातील पहिला "पीपीपी‘ रेल्वे प्रकल्प असल्याने काळजी वाटते, असे माजी मुख्यमंत्री आणि कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी "सकाळ‘ला सांगितले. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा "पीपीपी‘ तत्त्वावर उभारताना वाईट अनुभव आला, असेही ते म्हणाले. 

चिपळूण-कराड लोहमार्ग 

- प्रकल्पाचा खर्च 3195 कोटी, कालावधी पाच वर्षे 

- लांबी : 103 किमी; रस्ते प्रवासाचे 425 किमी अंतर कमी होईल 

- रत्नागिरी जिल्ह्यात 37 किमी, साताऱ्यात 66 किमी 

- स्थानके : विव्हाळे, मुंढे, कोयना रोड, पाटण, शेडगेवाडी, खोदाशी 

- 46 किमीचे 16 बोगदे, 56 मोठे व 100 अन्य पूल 

- 12.8 किमी लांबीचा सर्वांत मोठा बोगदा 

Web Title: Karad-Chiplun rail line to complete five years - the Lord