'पारदर्शी' महाराष्ट्र भ्रष्टाचारात चौथा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नवी दिल्ली : पारदर्शी कारभारासाठी ओळख असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात चौथे सर्वांत भ्रष्ट राज्य ठरले आहे, अशी माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

देशातील भ्रष्टाचाराबाबत 'सेंटर फॉर मीडिया स्टडीज' (सीएमएस) या स्वयंसेवी संस्थेने देशात सर्वेक्षण केले आहे. यामध्ये सरकारी कामे करून घेण्यासाठी देण्यात येणारी लाच या आधारावर माहिती गोळा करण्यात आली होती. 'सीएमएस'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालाच्या माध्यमातून भ्रष्ट राज्यांची माहिती पुढे आली आहे.

देशात भ्रष्टाचारामध्ये कर्नाटक आघाडीवर आहे. कर्नाटकनंतर आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर व पंजाबचा क्रमांक लागतो. हिमाचल प्रदेश, केरळ आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

'सीएमएस'ने 20 राज्यांमधील शहरी व ग्रामीण भागात जाऊन सर्वेक्षण केले आहे. शिवाय, तीन हजार नागरिकांचे मतही जाणून घेतले आहे. देशातील 53 टक्के नागरिकांना सरकारी कामे करून घेण्यासाठी लाच द्यावी लागत होती, असे 2005 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणातून पुढे आले होते. परंतु, गेल्या वर्षभरात एक तृतीयांश नागरिकांना सरकारी कामे करून घेताना वर्षभरात किमान एकदा तरी लाच द्यावी लागत आहे, असे नव्या पाहणीतून समोर आले आहे.

दरम्यान, नोव्हेंबर व डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीच्या काळात भ्रष्टाचार कमी झाल्याचे मत नागरिकांनी नोंदविले आहे.

टॉप 5 भ्रष्ट राज्यांमधील राजकीय परिस्थिती -

  • राज्य   -     सत्ता कोणाकडे?
  • कर्नाटक   -    काँग्रेस
  • आंध्र प्रदेश   -     तेलगू देसम
  • तमिळनाडू   -     अण्णा द्रमुक            
  • महाराष्ट्र    -    भाजप-शिवसेना
  • जम्मू-काश्मीर    -    पीडीपी-भाजप
  • पंजाब -       काँग्रेस