52 हजार शेतकऱ्यांना 250 कोटींचा लाभ 

52 हजार शेतकऱ्यांना 250 कोटींचा लाभ 

कोल्हापूर - राज्य सरकारने आज सरसकट कर्जमाफीला निकषासह तत्त्वता मंजुरी दिल्याच्या निर्णयाचा कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 52 हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुमारे 250 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. प्रत्यक्षात या निर्णया संदर्भात निकष व इतर अटी निश्‍चित झाल्यानंतर किती शेतकऱ्यांना याचा लाभ होणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान,मध्यमवर्गीय भूधारक शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची घोषणा झाल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

राज्य सरकारने शेतकरी संपानंतर केलेल्या अल्पभूधारक शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याची टीका राज्यभर होऊ लागली होती. या कर्जमाफीतील निकषांचा विचार करता लाखो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचीत राहणार होते. त्यामुळे केवळ अल्पभूधारक थकीत शेतक-यांची कर्जमाफी न करता सरसकट शेतक-यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी झाली होती. त्यानुसार राज्यभर आंदोलन पेटले होते. उद्याही (सोमवार) जिल्ह्यातील सर्व तहसिलदार कार्यालवर धरणे आंदोलन व मंगळवारी रेलरोको आंदोलन केला जाणार होता. दरम्यान, आज शासनाच्या मंत्री समितीने हा निर्णय घेवून तात्पुरता का असेना शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 

1 जूनपासून शेतक-यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी फडणवीस सरकारने अल्पभूधारक थकीत शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. परंतु हे करत असताना 30 जून 2016 पर्यंत थकीत असणा-या शेतक-यांचीच कर्जमाफी करण्याचे जाहीर केले होते. यामध्ये देखील शून्य ते 50 हजार, 50 हजार ते 1 लाख आणि 1 लाख ते दीड लाख अशी कर्ज घेतलेल्यांचे टप्पे केले होते. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात 6 लाख 7 हजार 893 शेतकरी कर्जास पात्र ठरतात. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतक-यांना जवळपास 70 टक्के कर्जपुरवठा करणा-या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेककडे 3 लाख 78 हजार 305 शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यापैकी 30 जून 2016 पर्यंत अवघे 50 हजार शेतकरीच थकीत आहेत. यांचाच विचार या कर्जमाफीसाठी होऊ शकतो. त्यामुळे सरसकट कर्जमाफी व्हावी, अशी मागणी राज्यासह जिल्ह्यातून होत होती. 

जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि इतर 34 बॅंका शेतक-यांना कर्जपुरवठा करतात. त्यापैकी मध्यवर्ती बॅंकेचा जरी विचार केला तरी 3 लाख 78 हजार 305 शेतक-यांपैकी केवऴ 50 हजार शेतक-यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल. यामध्ये इतर शेतक-यांचा समावेश नाही. त्याचबरोबर ज्या अल्पभूधारक शेतक-यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली आहे.खाते थकबाकीत जाऊ नये यासाठी बाहेरून कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून पीक कर्जाचे पैसे भरलेत अशा शेतक-यांवर हा अन्याय होणार होता. यासाठी सरसकट शेतक-यांची कर्जमाफी व्हावी होणे अपेक्षित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com