किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - ‘नदी वाचवा- जीवन वाचवा’ ही संकल्पना घेऊन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गुरुवार (ता. १४) पासून रविवार (ता. १७)पर्यंत होत आहे. यंदाचा वसुंधरा सन्मान पुरस्कार आयआयटी मुंबईचे पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. श्‍याम आसोलेकर यांना देण्यात येणार आहे. 

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांच्या हस्ते रविवारी (ता. १७) पुरस्कार वितरण होणार आहे. लहान मुलांसाठी विशेष चित्रपट तसेच मोठ्यांसाठी अभ्यासपूर्ण सहली, देवराई अभ्यास, असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक उदय गायकवाड, राहुल पोवार, अनिल चौगुले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.   

नद्या वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शिक्षकाला वसुंधरा सन्मान पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार डॉ. आसोलेकर यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनिअर पदवी घेतली आहे. घातक जैव, वैद्यकीय, नागरी घनकचराचे व्यवस्थापन, पर्यावरणपूरक उद्योगाचे जाळे, पर्यावरण केंद्रित किफायतशीर सांडपाणी प्रक्रिया, औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया, पर्यावरणीय धोरण आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर संशोधन  केले आहे.  

महोत्सवातील कार्यक्रम असे ः गुरुवारी (ता. १४) वेंगुर्ला नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांची उपस्थिती, शुक्रवारी (ता. १५) सकाळी सातला (कोगे, ता. करवीर) येथे लहू मोरे यांच्या सेंद्रीय शेती प्रकल्पास अभ्यास सहल, सकाळी दहाला ‘रिव्हर ॲण्ड आर्किटेक्‍चर’ परिसंवाद आर्किटेक्‍चर कॉलेज (सहभाग- डॉ. जय सामंत, आर्किटेक्‍ट अमरजा निंबाळकर, प्राचार्य संदीप दिघे, वंदना पुसाळकर).

दुपारी दोनला लहान मुलांसाठी पर्यावरणविषयक चित्रपट प्रदर्शन, सायंकाळी साडेपाचला वसुंधरा मित्र व वसुंधरा गौरव प्रधान (शाहू स्मारक). 

शनिवारी (ता. १६) सकाळी साडेआठला ‘रिव्हर फन’ लहान मुलांसाठी पंचगंगा घाट येथे मनोरंजक खेळ, ‘युवा संवाद’, ‘शोध नदीचा’ या विषयांवर महाविद्यालयीन युवकांचा परिसंवाद सायबर महाविद्यालयात दुपारी दोनला होईल. महिलांसाठी पर्यावरणविषयक चित्रपट प्रदर्शन. 

सायंकाळी साडेपाचला ‘सूर सरिता’ किर्लोस्कर कंपनी कर्मचारी वाद्यवृंद, शाहू स्मारक येथे होईल. 

रविवारी (ता. १७) सकाळी साडेसातला (साके, ता. कागल) येथे देवराई अभ्यास, सकाळी दहाला ‘रिव्हर ॲण्ड इंजिनिअरिंग स्थळे’ केआयटी कॉलेज, दुपारी दोनला युवकांसाठी पर्यावरणविषयक चित्रपटांचे प्रदर्शन, शाहू स्मारक ‘वसुंधरा सन्मान’ पुरस्कार वितरण, सायंकाळी सातला समारोप, चित्रपट शाहू स्मारक भवन  येथे होईल.   

या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. यात निसर्गमित्र संस्था, बापूसाहेब पाटील ग्रंथालय, साईक्‍स एक्‍टेंशन व बुरेसे ब्रदर्स, राजारामपुरी, शाहू स्मारक येथे नावनोंदणी सुरू आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक मित्र अनिल चौगुले यांनी  केले आहे.

Web Title: kolhapur news Kirloskar Vasundhara Film Festival