कोयना धरणातून पाणी सोडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

पाटण - कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांनी उचलून आज दुपारी दोनच्या सुमारास 15 हजार 590 क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरवात करण्यात आली. पायथा वीजगृहातून आधीपासूनच 2100 क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे सध्या एकूण 17,690 क्‍युसेक पाणी धरणातून सोडण्यात येत आहे. पावसाच्या पाण्याची होणारी आवक विचारात घेऊन सलग तीन दिवस पाणी सोडण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी 2013 मध्ये धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. 

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे होत असलेल्या कन्यागत पर्वकालाच्या पार्श्‍वभूमीवर कोयना धरणातून जादा पाणी सोडण्याचा निर्णय शनिवारी रात्री कऱ्हाडमध्ये सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला होता. कोयना धरण व्यवस्थापनाने दहा हजार क्‍युसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज दुपारी दोनच्या सुमारास धरणाची पाणीपातळी 2148.3 फूट व पाणीसाठा 86.33 टीएमसी असताना 15 हजार 590 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. यावेळी कोयना धरणाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्‍वर बागडे, उपअभियंता एस. एम. चव्हाण उपस्थित होते. 

पाणी सोडल्यानंतर तीन तासांनी संगमनगर धक्‍क्‍याचा जुना पूल पाण्याखाली गेला. मात्र, नवीन पुलावरून वाहतूक सुरू राहिली. त्यामुळे नदीपलीकडची गावे यंदाच्या पावसाळ्यात संपर्कात राहणार आहेत. धरणामध्ये एकूण 42 हजार 542 क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणीपातळी 2148.5 फूट व एकूण पाणीसाठा 86.48 टीएमसी आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगरला 178 मिलिमीटर, नवजाला 145 मिलिमीटर व महाबळेश्‍वरला 75 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

काही गावांना पुराची झळ शक्‍य
कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीपात्रात येणारे पाणी आणि पावसाचे पाणी यामुळे रात्री उशिरापर्यंत पाटणजवळील मूळगाव पूल पाण्याखाली जाण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. नदीकाठावरील पाटण, नावडी, त्रिपुडी, हेळवाक, मुंद्रुळ-हवेली, विहे व जमदाडवाडी या गावांना पुराची झळ बसू शकते.

""कोयना धरणात पावसाच्या पाण्याची होणारी आवक आणि उपलब्ध पाणीसाठा याचा विचार करून धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी-जास्त करण्याचा निर्णय घेण्यात येईल.‘‘
ज्ञानेश्‍वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण