गेल्यावर्षी भ्रूणहत्येच्या तब्बल 44 घटना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई - सांगली येथील म्हैसाळमध्ये भ्रूणहत्यांचे घडलेले प्रकरण ताजे असतानाच राज्यात गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात भ्रूणहत्या झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. मागच्यावर्षी (2016) तब्बल 44 भ्रूणहत्या झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. 

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल 2016 - 2017 मध्ये बालक आणि महिलांवरील अत्याचाराची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 2016 मध्ये 44 भ्रूणहत्या झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मागच्या दोन वर्षांपूर्वीपेक्षा ही संख्या फार अधिक आहे. 2014 मध्ये 12 आणि 2015 मध्ये 7 भ्रूणहत्या झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र 2016 मध्ये यामध्ये पाचपटींनी वाढ झाली. 

बालकांवरील बलात्कारांच्या 2086 घटना 2016 मध्ये घडल्या आहेत तर, महिलांवरील बलात्काराच्या 4 हजार 209 घटना घडल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात असला तरी, या अहवालातील आकडेवारीवरून महिलांवरील अत्याचारांत वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. महिलांवरील अत्याचाराचे 2016 मध्ये 32 हजार 548 गुन्हे घडले आहेत. त्या तुलनेत 2015 मध्ये 31 हजार 126 व 2014 मध्ये 26 हजार 693 गुन्हे घडले होते.