उपसा योजनेचे पंप सौरऊर्जेवर - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 ऑगस्ट 2016

कडेगाव (जि. सांगली) - टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना युतीच्या काळात सुरू झाल्या आणि त्या आम्हीच पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. परंतु, योजनांचे वीजबिल राज्य सरकारने भरावे, या मागणीला बगल देत योजनांचे विद्युत पंप सौरऊर्जेवर चालवण्याचा सरकार विचार करत असल्याची घोषणा केली. वीजबिलाच्या कटकटीतून कायमची सुटका होण्यासाठीचा हाच पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजपच्या पहिल्या शेतकरी मेळाव्यात फडणवीस यांनी शेतीच्या अर्थकारणाची पुरती मशागत करण्याचा सरकारचा मानस व्यक्त केला. जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. 

रायगाव (ता. कडेगाव) येथील केन ऍग्रो कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी मेळावा झाला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्यासह भाजप नेते व्यासपीठावर होते. 

फडणवीस म्हणाले, ""पेरणी ते काढणी खर्च पाहिला तर आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या अशी अवस्था आहे. शेतकरी कसा फायद्यात येणार? सकल उत्पन्नात शेतीची टक्केवारी वाढवण्यासाठी पिकांचे उत्पादन, शेतीची उत्पादकता वाढवली पाहिजे. शेतकऱ्यांना शाश्‍वत पाणी देऊन, शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभे करून हे साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आपल्याकडे सरकारने शेतीत अडचण आली तरच पैसे दिले. आमची भूमिका उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याची आहे.‘‘ 

ते म्हणाले, की 15 वर्षांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेतीसाठी 13 हजार कोटी रुपये दिले, आम्ही दोन वर्षांत 18 हजार कोटी रुपये दिले. शेती विम्यात 17 लाख शेतकरी होते, आम्ही एक कोटी 13 लाख विमाधारक केले. 4300 कोटींचा विमा दिला. अर्थसंकल्पात उच्चांकी 25 हजार कोटींची तरतूद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. विदर्भ, मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी टापूसाठी निधी मागितला. त्यांनी 2500 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पाच लाख शेततळी बांधायची आहेत. तीन आठवड्यांत तीन लाखांवर अर्ज आले. 85 हजार पात्र झाले, दहा हजार शेततळी पूर्ण झाली.‘‘ 

पेरणी ते काढणी खर्च पाहिला, तर आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या अशी अवस्था आहे. शेतकरी कसा फायद्यात येणार? 

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

Web Title: Lift pumps Solar Plan - Minister