राज्यात BA.4 व्हेरिएंटचे 6 तर BA.5 चे 17 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 49 वर

Stealth Omicron
Stealth Omicronsakal

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होताना दिसत आहे. आजही राज्यात महाराष्ट्रात आज 1,128 नवीन कोरोना रुग्णांची नोद झाली आहे, यादरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या 24,333 वर पोहचली आहे. तर राज्यात BA.5 व्हेरिएंटते आणखी 17 रूग्ण आणि Omicron च्या BA.4 व्हेरिएंटचे सहा रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती शनिवारी कस्तुरबा हॉस्पिटल सेंट्रल लॅबोरेटरी, मुंबईच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

आज राज्यात पहिल्यांदाच BA 5 व्हेरीयंट 17 आणि BA 4 व्हेरीयंटचे 7 रुग्ण सापडले आहेत. या कोरोना रुग्णां मध्ये 11 पुरूष आणि 12 स्त्रिया आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेलल्या BA 5 आणि BA 4 रुग्णांची संख्या 49 झाली आहे. यामधील 15 पुण्यातील, तर 28 मुंबई, नागपूरमध्ये चार आणि ठाण्यातील दोन रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

हे सर्व नमुने 1 ते 18 जून 2022 या कालावधीत गोळा करण्यात आले. रिपोर्टनुसार, एक रुग्ण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा, दोन रुग्ण 18-25 वयोगटातील, 26-50 वयोगटातील नऊ आणि 11 जण 50 वर्षांवरील आहेत. यापैकी 11 पुरुष आणि 12 महिला आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतात याआधी हैदराबादमधून BA.4 सब व्हेरिएंटचे पहिले प्रकरण नोंदवले होते आणि नंतर भारतीय SARS-CoV2 जीनोमिक्स कन्सोर्टियमने तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये BA.4 आणि BA.5 उप-प्रकारातील प्रकरणे आढळून आल्याची पुष्टी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com