महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीत अत्यल्प मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

राज्यात 16 हजार, मुंबईत 2 हजार 289 डॉक्‍टरांचा प्रतिसाद
मुंबई - सुरुवातीपासूनच वादात अडकलेली महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची निवडणूक रविवारी (ता. 18) शांततेत पार पडली. राज्यातील 85 हजारांपैकी अवघ्या 16 हजार 738 डॉक्‍टरांनी मतदान केले. मुंबईत सर्वांत कमी मतदान झाल्याचे कळते. मुंबईतील सुमारे 30 हजारांपैकी अवघ्या 2 हजार 289 डॉक्‍टरांनी मतदान केले.

सर्वाधिक मतदान केंद्रे असतानाही मुंबईत मतदान कमी झाले आहे. मुंबईत 24 केंद्रे होती. त्यातील 14 केंद्रे वांद्रे यथे आणि 10 केंद्रे जे. जे. रुग्णालयात होती. राज्यात एकूण 110 केंद्रे होती. अनेकांना मतदान केंद्र कुठे आहे, हेच माहीत नव्हते. रविवारी सुट्टी होती, यामुळे मतदान कमी झाले, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. यंदाही निवासी डॉक्‍टरांना त्यांच्या नोंदणीकृत विभागातच मतदान करावे लागल्याने मतदानात घट झाल्याचे डॉक्‍टरांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

शुक्रवारी मतमोजणी
वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक यंदा राजकीय पक्षांच्या सहभागाने वेगळी ठरली. पक्षीय हस्तक्षेप आणि कमी मतदानामुळे या निवडणुकांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी (ता. 23) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

काही शहरांतील मतदान
पुणे - 9485 पैकी 2061
ठाणे - 7906 पैकी 1260
औरंगाबाद - 3043 पैकी 1173
रायगड - 1400 पैकी 243

महाराष्ट्र

सांगली - नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाकडून (एनएचबी) मिळणाऱ्या हरितगृह अनुदानासाठी गुजरात, मध्य प्रदेश ही राज्ये आणि विदर्भाचा अपवाद...

04.18 AM

मुंबई - श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला....

04.03 AM

मुंबई - सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष...

03.36 AM