दहशतवादी हल्ल्यातून महाराष्ट्राचे आमदार बचावले

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

पुणे: महाराष्ट्रातून जम्मू-काश्मिरला गेलेल्या आमदारांच्या पथकावर अतिरेक्यांनी हल्ला केला असून, या दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यातून पाचही आमदार सुदैवाने बचावले आहेत. जम्मू-काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्याती बिज बिहारीमध्ये ही घटना घडली.

महाराष्ट्रातील पाच आमदार पंचायत राज समितीच्या कामानिमित्त 19 मे रोजी जम्मू-काश्मिरला गेले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे व आमदार दीपक चव्हाण, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील व आमदार तुकाराम काते तर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर पारवे यांचा समावेश आहे. आमदारांनी या घटनेची माहिती विधिमंडळाला दिली आहे. आमदारांच्या वाहनांचे नुकसान झाले असून दोन गाड्या पंक्चर झाल्या आहेत.

आमदार - पक्ष - मतदारसंघ पुढीलप्रमाणेः

  1. किशोर आप्पा पाटील- शिवसेना- पाचोरा (जळगाव)
  2. दीपक चव्हाण- राष्ट्रवादी- फलटण (सातारा)
  3. तुकाराम काते - शिवसेना- मानखुर्द (मुंबई)
  4. विक्रम काळे- राष्ट्रवादी- औरंगाबाद शिक्षक मतदार संघ
  5. सुधीर पारवे- भाजप - उमरेड (नागपूर)
Web Title: maharashtra mla escaped from terrorist attack in kashmir