सरसकट कर्जमाफी हवी -  अशोक चव्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 जून 2017

मुंबई - शेतकरी संपावर असताना राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शेतकरी प्रश्‍नावर चर्चा करावी. दरम्यान, केवळ अल्पभूधारकांना कर्जमाफीचे आश्‍वासन देवून शेतकऱ्यांमधे फुट पाडू नये. सरकारने सर्वच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज केले. 

कॉंग्रेसच्या मुंबई कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या संपाला कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. मात्र, संप दीर्घकाळ चालणे योग्य नाही. मुख्यमंत्री आणि सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न केल्यानेच शेतकरी संप अधिक तीव्र झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला. 

मुख्यमंत्री राजकारण करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हिंसा करत आहेत असे बेछूट आरोप करित आहेत. त्यांचा आरोप चुकीचा असून गुंड कोणाच्या पक्षात आहेत ? हे भाजपने पहावे. असा टोला खासदार चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. युपीए सरकारच्या काळात किमान आधारभूत किंमतीत दरवर्षी 14 टक्के वाढ केली जात होती 10 वर्षात किमान आधारभूत किंमत 140 टक्‍क्‍यांनी वाढवली होती; पण मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या काळात किमान आधारभूत किंमतीत फक्त 1.7 टक्के वाढ झाली आहे. किमान आधारभूत किंमतीत केंद्र सरकार वाढ करत नाही. 

सततचा दुष्काळा आणि शेतीमालाचा पडलेला भाव यामुळे राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश कोरवाहू शेतक-यांचे शेतीचे क्षेत्र पाच एकरांपेक्षा जास्त आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा म्हणून सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी असे चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा अभ्यास केव्हा संपणार? असा सवाल करित समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनवर पैसे खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असे ते म्हणाले.