अस्मिता योजना येत्या १५ ऑगस्टपासून लागू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

मुंबई - महिला व बालविकास विभागामार्फत शालेय मुलींसाठी ‘सॅनिटरी पॅड’ पाच रुपयांत ऊपलब्ध करून देणारी ‘अस्मिता’ योजना येत्या १५ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

‘सॅनिटरी पॅड’चा वापर युवतींच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे, हे सिद्ध झालेले असूनही चाळीस रुपयांपर्यंत किंमत असलेले हे पॅड घेणे बहुतांश कुटुंबांच्या आवाक्‍यात नसते. त्यामुळे अवघ्या पाच रुपयांत व स्थानिक महिला बचत गटांच्या मदतीने शाळा किंवा घराजवळ हे पॅड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पंकजा यांनी सांगितले ‘अस्मिता’ योजनेमुळे तळागाळातील युवतींपर्यंत मासिक पाळीदरम्यान आरोग्याची काळजी घेण्याबद्दल जागृती होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.