खऱ्या शेतकऱ्यांशीच चर्चा करणार - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

मुंबई : ‘राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ७० टक्‍के मागण्या पूर्ण केल्या असून, सध्या जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचे आंदोलन आहे. पण, या आंदोलनाबाबत चर्चा करायची असेल तर मी खऱ्या शेतकऱ्यांशीच करेन. जे शेतकरी नाहीत त्यांच्याशी चर्चा करणार नाही,’ असा पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला आहे.  

सह्याद्री अतिथीगृह येथे आज कोको कोला कंपनीच्या ‘मिनीट ए पल’ मोसंबी या उत्पादनाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राज्यभरात शेतकऱ्यांना सरकारची भूमिका कळाली आहे. पंधरा वर्षांचा पूर्वीच्या सरकारचा कारभार आणि आमचा अडीच वर्षांचा कारभार यात फरक आहे. शेतकऱ्यांना तो चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे, खरा शेतकरी सरकारच्या सोबत आहे. मात्र, सध्या आंदोलन पेटवण्यासाठी काही राजकीय पक्ष पुढे आले आहेत. राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना पुढे करून आंदोलन करणे हे पाप आहे.’’