शेतकरी कर्जमाफीसाठी बॅंकांनी माहिती द्यावी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारपर्यंत (ता. 22) आहे. या मुदतीत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. बॅंकांनी वेळेत कर्जमाफीसाठीची सर्व माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाला उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सरकारी, तसेच राष्ट्रीयीकृत बॅंकांना मंगळवारी केली. 

मंत्रालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी झाली, त्या वेळी ते बोलत होते. मंगळवारी दुपारी 12 पर्यंत 56 लाख सात हजार 883 शेतकरी कुटुंबांचे अर्ज मिळाले आहेत. बॅंकांनी कर्जमाफीसाठी लागणारी सर्व माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाला वेळेत द्यावी. बॅंकांकडून सर्व माहिती मिळाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने तपासणी करावी. ती पूर्ण झाल्यानंतर माहिती उपलब्ध झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी चर्चा या वेळी झाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.