विरोधी मतदारसंघांत भाजपचा थिंक टॅंक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई  - राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय भाजपने जाहीर केला असून, त्या दृष्टीने सध्या रणनीती आखली जात आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघांत भाजपचे आमदार नाहीत, त्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी भाजपचा थिंक टॅंक कार्यरत राहणार आहे. इच्छुक आणि संबंधित प्रभागातून निवडून येऊ शकतील, अशा भावी आमदारांना प्रशिक्षण देण्याचे सुरू झालेले काम हे त्याचाच भाग आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा थिंक टॅंक कार्यरत असून, भाजपचे मंत्री, आमदार, खासदार यांच्या कामाची पडताळणी सध्या केली जात आहे. मंत्री, आमदारांना चांगल्या कामांद्वारे लोकांपर्यंत पोचण्याच्या सूचना भाजपच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत. स्थानिक प्रश्‍न कोणते आहेत, ते कसे सोडवावेत, पक्ष कुठे कमी पडत आहे. अशा पातळीवर माहिती गोळा केली जात आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या आमदारांसोबत भावी आमदारांना स्थानिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निधी देण्याचाही विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. 

काम न करणारेही सक्रिय  
भाजपच्या नवीन रणनीतीनुसार राज्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून, त्यांनी येत्या काही दिवसांत आपले चांगले काम दाखवावे, असे सांगण्यात येत आहे. भावी आमदारांच्या मदतीसाठी विधानसभा मतदारसंघात 275 ते 310 बूथ व प्रत्येक बूथवर 20 ते 25 विस्तारक काम करणार आहे. आपापल्या प्रभागाचा सखोल अभ्यास असलेल्या व्यक्तीचा विचार उमेदवारीसाठी होईल. त्यामुळे सध्या काम न करणारे आमदारही कामाला लागले आहेत. 

Web Title: maharashtra news bjp