मुंबई भाजपची चूक सोशल मीडियावर ट्रोल 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - महिन्याभरापूर्वी पुराच्या पाण्याचा तडाखा बसलेले बिहारमधील 20 जिल्हे अद्यापही सावरलेले नाहीत. येथील पूरग्रस्तांना देशभरातून मदत होत आहे. महाराष्ट्र भाजपनेही बिहारच्या पूरग्रस्तांसाठी तेथील भाजप नेत्यांकडे मोठा गाजावाजा करत धनादेशाद्वारे रक्कम दिली; मात्र अक्षरी आणि आकड्यांमध्ये गफलत झाल्याने मुंबई भाजपचे सोशल मीडियावर पुरते हसू झाले. 

मुंबई येथे शनिवारी (ता. 16) झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपने बिहार भाजपच्या नेत्यांकडे पूरग्रस्तांना आर्थिक स्वरूपातील मदतीचा धनादेश दिला. हा धनादेश स्वीकारण्यासाठी बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी मोठ्या प्रेमपूर्वक हा चेक स्वीकारला खरा, मात्र या धनादेशवरील एका मोठ्या चुकीमुळे हे प्रकरण सोशल मीडियात चांगलेच गाजले. धनादेश सुपूर्द करताना छायाचित्रे काढण्यासाठी नेत्यांनी खास पोझ दिल्या. धनादेशही सर्वांना दिसेल अशा पद्धतीने धरण्यात आला. या धनादेशाकवर "एक कोटी वीस लाख रुपये मात्र' असे अक्षरी, तर आकड्यांमध्ये एक कोटी 25 लाख लिहिण्यात आले होते. 

या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पसरल्यानंतर भाजपची ही चूक नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. याच संधीचा फायदा घेत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही मग या कार्यक्रमावर टीका केली आणि "नकली कार्यक्रम' असे ट्‌विट करत खिल्ली उडविली.