मुख्यमंत्री फेलोशिपसाठी परीक्षेचा "पॅटर्न' बदलणार 

हर्षदा परब /किरण कारंडे
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई - मुख्यमंत्री फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचा "पॅटर्न' यंदाच्या तिसऱ्या वर्षी बदलण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान यांनी सांगितले. 

मुंबई - मुख्यमंत्री फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचा "पॅटर्न' यंदाच्या तिसऱ्या वर्षी बदलण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री फेलोशिपला राज्यातील विविध जिल्ह्यांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी आणि आयटी विभागातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची पात्रता ठरविणाऱ्या समितीच्या लक्षात आले. दोन वर्षांच्या अनुभवानंतर या परीक्षेच्या "पॅटर्न'मध्ये बदल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार यंदा होणाऱ्या फेलोशिप परीक्षेसाठी इतर विषयांवर आधारित प्रश्‍नांसह सामान्य ज्ञानाच्या प्रश्‍नांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खान यांनी सांगितले. ही विभागणी 50-50 टक्के असेल, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे वेगवेगळ्या शाखांमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे सोपे जाईल. तसेच वेगवेगळ्या शाखांमधील विद्यार्थ्यांना या ऑनलाइन परीक्षेत पात्र होण्याची संधी मिळणार आहे. 

या वर्षासाठी पाच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी अडीच हजार विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहेत. 

यंदा देशभरातून प्रतिसाद 
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी राज्यात शहरी भागातून विद्यार्थी येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असले तरी राज्याच्या छोट्या जिल्ह्यांमधूनही विद्यार्थी अर्ज करतात. या फेलोशिपसाठी यंदा राज्याबाहेरूनही विद्यार्थी आले आहेत. 

"सकाळ'मधील लेखानंतर प्रतिसाद वाढला 
"सकाळ'च्या सप्तरंग पुरवणीत मुख्यमंत्री फेलोशिपवर संदीप वासलेकर यांनी लिहिलेल्या लेखानंतर फेलोशिपसाठी येणाऱ्या अर्जांमध्ये वाढ झाल्याचे प्रिया खान यांनी सांगितले. 

महाराष्ट्र

पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या...

06.27 AM

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला...

05.48 AM

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात...

05.03 AM