विधानसभा पीकविमा योजनेच्या मुदतवाढीसाठी केंद्राला साकडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई - पीकविमा योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 जुलैनंतर वाढवून देण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

मुंबई - पीकविमा योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 जुलैनंतर वाढवून देण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

पीकविमा योजनेसाठी अर्ज करायला लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी "ई अर्जां'मुळे शेतकऱ्यांचा गोंधळ सुरू असल्याची खंत गुरुवारी विधानसभेत आमदारांनी व्यक्त केली. डी. पी. सावंत यांनी नांदेड जिल्ह्यात अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार झाल्याचेही आज सभागृहात सांगितले. शेतकऱ्यांची ही गर्दी लक्षात घेता अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आल्याचे महसूलमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. वीमा कंपन्यांना सध्या प्रचंड लाभ होतो आहे, पण शेतकऱ्यांना मिळणारा परतावा कमी अत्यल्प असल्याची खंत आमदारांनी व्यक्त केली. दुष्काळाची नुकसानभरपाई तालुकाच नव्हे, तर मंडल स्तरावर देण्याची सूचना पतंगराव कदम यांनी केली. दुष्काळातील नुकसानभरपाई विमा देयके यांचा सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास करून माहिती पटलावर ठेवण्याचे मान्य करण्यात आले आहे.