बनावट नोटांप्रकरणी राजकीय नेता अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अंधेरी परिसरातील स्थानिक राजकीय नेत्याला बनावट नोटांप्रकरणी अटक केली. त्याच्या घरातून 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. हा नेताच बनावट नोटांच्या रॅकेटचा म्होरक्‍या आहे, अशी माहिती "डीआरआय'चे सहसंचालक समीर वानखेडे यांनी दिली. 

रेहान खान असे अटक आरोपीचे नाव आहे. आपण स्थानिक पक्षाचा मुंबई सचिव असल्याचे तो सांगतो. रेहानच्या अंधेरीतील घरातून 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात "डीआरआय'ला यश आले आहे. यापूर्वी यातील आणखी एका स्थानिक नेत्याला अटक करून त्याच्याकडून 8 लाख 90 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या सर्व नोटा बांगलादेशातून आणण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बॅंकेने नव्याने बनवलेल्या पाचशेच्या नोटांमध्ये सुरक्षेची 27 वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यातील 15 वैशिष्ट्ये या नोटांमध्ये आहेत. या रॅकेटचा प्रमुख असलेला खान हा बनावट नोटांमधील पैसा डान्सबारमध्ये उडवायचा. त्याने एका रात्रीत पाच लाख रुपयेही उधळल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.