तुरीसाठी ६३८ कोटींची राज्य सरकारची हमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवर बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत तूर खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबई - राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवर बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत तूर खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

त्यामुळे तूर खरेदी केंद्रावर टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन संघ नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या नोडल एजन्सीमार्फत तूर खरेदीची रक्‍कम देण्यासाठी युनियन बॅंक ऑफ इंडियाकडून उभ्या केल्या जाणाऱ्या कर्जासाठी सरकार ६३८ कोटी रुपयांची हमी देत आहे. राज्यात गेल्या वर्षी तुरीची ६७ लाख ३४ हजार ७५६ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. विविध केंद्रांवर ३ हजार ४०१ कोटी रुपये किमतीची तूर खरेदी करण्यात आली असून, त्यांना ३ हजार ३४१ कोटी ३२ लाख रुपयांची देणी वितरित करण्यात आली आहेत.