'उत्तर महाराष्ट्रातील उपसा सिंचनाची कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मुंबई - शेळगाव बॅरेज, वरखेड लोंढे, निम्न तापी व कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेची कामे डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे दिली. 

मंत्रालयात महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत विविध प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्या वेळी ते बोलत होते. 

महाजन म्हणाले, शेळगाव बॅरेज प्रकल्पातील प्रस्तंभाच्या संधानकाची (कॉंक्रीट) कामे आवश्‍यक तांत्रिक बाबी पूर्ण करून 22 नोव्हेंबरला सुरू कराव्यात. या प्रकल्पातील अंजाळे पूल व जोगलखेड या पुलांची निविदा प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत पूर्ण करावी. प्रकल्पातील समाविष्ट उर्वरित दोन पुलांची निविदा प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. वरखेड-लोंढे व निम्न तापी या प्रकल्पांच्या पिलर्सची (प्रस्तंभ) कॉंक्रीट कामे 1 डिसेंबरला सुरू करावीत. 

कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस आवश्‍यक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांच्याकडून मंजूर करून योजनेची चाचणी डिसेंबर 2018 पर्यंत घेण्यात यावी. सहकारी उपसा सिंचन योजनांची देखभाल दुरुस्तीची आवश्‍यक कामे नोव्हेंबर 2017 अखेर सुरू करावीत, असे निर्देश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हतनूर प्रकल्पाच्या सांडव्यामधील अतिरिक्त दरवाजांची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव त्वरित सादर करावा, असेही महाजन यांनी सांगितले. 

तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत प्रलंबित सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या विविध प्रस्तावांचा या वेळी आढावा घेण्यात आला. 

बैठकीस आमदार हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ, उन्मेश पाटील, चंदूभाई पटेल उपस्थित होते. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, लाभ क्षेत्र विकास सचिव बिराजदार, प्रकल्प समन्वय सचिव पानसे, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, मेरी संचालक खापरे तसेच नाशिक मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेचे मुख्य अभियंता उपासनी व महामंडळातील सर्व अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंते उपस्थित होते. 

Web Title: maharashtra news girish mahajan irrigation North Maharashtra