हमी योजनेचा निधी आता थेट लाभार्थींच्या खात्यात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 जून 2017

मुंबई - वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा निधी लाभार्थींच्या थेट बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय रोजगार हमी विभागामार्फत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाभार्थी त्यांना लागणारे साहित्य स्वत: "टीन' नंबर असणाऱ्या दुकानदारांकडून खरेदी करू शकणार असल्याने कामांना वेग येईल, अशी माहिती रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 

सिंचन विहीर, शेततळे, फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे अशा काही वैयक्तिक लाभाच्या योजना रोहयो विभागामार्फत राबविण्यात येतात. यासाठीचे सिमेंट, वीट, वाळू, स्टील इत्यादी विविध साहित्य खरेदीसाठीचा निधी लाभार्थींना थेट त्यांच्या खात्यावर देण्यात येणार आहे. 

वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी या आधी ग्रामपंचायतींमार्फत साहित्य खरेदी करून लाभार्थींना पुरविले जात होते. शासनाकडून ग्रामपंचायतीमार्फत विक्रेत्यास निधी देण्यात येत होता. मात्र, विक्रेत्यांकडून शेतकरी लाभार्थींना लाभ प्रदान करण्यास विलंब होत होता. त्यामुळे लाभार्थींना वेळेवर योजनांचा लाभ मिळाल्यास योजनांना गती येईल, म्हणून यापुढे आता साहित्य खरेदीसाठीचे कुशल पेमेंट थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. यासाठी लाभार्थीलाच वेंडर म्हणून नियुक्त करण्याचा मानस आहे. त्याने स्वखर्चाने साहित्य खरेदी केल्यानंतर त्याचे देयक ग्रामरोजगार सेवकाकडे जमा करावे, त्यानंतर सात दिवसांच्या आत या देयकांची रक्कम थेट लाभार्थीच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. 

मजुरांची मागणी व काम सुरू करण्यामध्ये होत असलेल्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी "ई-मस्टर' आता तालुका स्तराऐवजी ग्रामपंचायत स्तरावरूनच काढण्याचा निर्णय रोहयो विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे मजुरांना आपली मजुरी वेळेत मिळणार असल्याचे रावल यांनी सांगितले. शिवाय ग्रामरोजगार सेवकांना तालुकास्तरावर येण्याची गरज नसून या विकेंद्रीकरणामुळे तालुकास्तरावरील कामाचा ताणही कमी होणार असल्याचे ते म्हणाले. 

महाराष्ट्र

पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या...

06.27 AM

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला...

05.48 AM

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात...

05.03 AM