मुख्यमंत्र्यांसाठी लवकरच अत्याधुनिक हेलिकॉप्टर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातूरमधील निलंगा आणि रायगडमधील अलिबाग येथे अपघात झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या हेलिकॉप्टरसाठी सुमारे 90 कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचे समजते. 

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातूरमधील निलंगा आणि रायगडमधील अलिबाग येथे अपघात झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या हेलिकॉप्टरसाठी सुमारे 90 कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचे समजते. 

हेलिकॉप्टर अपघातांच्या दोन घटनांनंतर मुख्यमंत्र्यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्‍न चर्चेत आला होता, त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून हेलिकॉप्टर खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो सामान्य प्रशासनला पाठविण्यात आला होता. सध्या तो वित्त विभागाकडे आहे. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान या प्रस्तावावर प्राथमिक चर्चाही झाली. राज्य सरकार महत्त्वाच्या व्यक्तींसाठी डाऊफिन-एन 3 या प्रकारच्या हेलिकॉप्टरचा वापर करत होते. त्यांचा दहा- बारा वर्षांपासून वापर होत आहे. पायलटच्या दोन आसनांसह सहा आसन व्यवस्था असलेल्या या हेलिकॉप्टरची किंमत सुमारे 12 कोटी आहे. यामध्ये अत्याधुनिक अतिरिक्त सुरक्षाविषयक उपकरणांचा अभाव आहे. 

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी सुरक्षा निकषांत आता बदल करण्यात आल्यामुळे हे हेलिकॉप्टर तांत्रिक निकषांत बसत नसल्याने ते विकून नवे खरेदी करण्याचा सरकारचा विचार आहे. जुने हेलिकॉप्टर विक्री आणि नवे हेलिकॉप्टर खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निविदा मागविण्यात येणार आहेत. रॉबिनसन, बेल, एअरलिफ्ट या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशीही खरेदीप्रकरणी जुजबी चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महाराष्ट्र

पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या...

06.27 AM

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला...

05.48 AM

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात...

05.03 AM