हिंदीचा वाढतोय बोलबाला 

श्रद्धा पेडणेकर
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई - प्रसार माध्यमांचे वाढते प्रस्थ, तसेच बॉलिवूडचे गारूड यामुळे काही वर्षांमध्ये हिंदी बोलणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शिक्षणासाठीही हिंदीचा पर्याय निवडला जातोय. येत्या काळात हिंदीचे प्राबल्य अधिक वाढेल, असा विश्‍वास अभ्यासकांना वाटतोय.

मुंबई - प्रसार माध्यमांचे वाढते प्रस्थ, तसेच बॉलिवूडचे गारूड यामुळे काही वर्षांमध्ये हिंदी बोलणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शिक्षणासाठीही हिंदीचा पर्याय निवडला जातोय. येत्या काळात हिंदीचे प्राबल्य अधिक वाढेल, असा विश्‍वास अभ्यासकांना वाटतोय.

एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाशी हिंदीत संवाद साधतो, असं गमतीने म्हटले जाते; मात्र हिंदीचा किती प्रभाव आहे, याचे हे बोलके उदाहरण. भारत हा विविध राज्यांनी बनलेला आहे, प्रत्येकाला स्वतःची प्रादेशिक भाषा आहे; मात्र कोणत्याही राज्यात परराज्यातील व्यक्ती ही हिंदीतूनच संवाद साधताना दिसते. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये हिंदी अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे बातम्या, मालिका, चित्रपट, कार्टुन यांच्या अनेक वाहिन्या हिंदीतील असल्यामुळे हिंदी भाषा अवगत असणाऱ्यांना मोठा रोजगारही या भाषेने उपलब्ध करून दिल्याकडे भाषा अभ्यासक लक्ष वेधतात. हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे. हिंदीची प्रेक्षकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे बॉलिवूडच्या चित्रपटांच्या कमाईवरून दिसते. त्याचप्रमाणे भारतात आल्यानंतर हिंदी शिकणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्याही वाढत आहे.

हिंदीचं प्राबल्य वाढत असून, केवळ बॉलिवूडच नव्हे आता ‘इस्रो’सारखी संस्थाही हिंदीतून पुस्तक प्रकाशित करण्यासाठी उत्सुक आहे. हिंदी देशातल्या सर्वसामान्यांची भाषा होत आहे. भारतातल्या तळागाळापर्यंत पोचण्यासाठी हिंदीला पर्याय नाही. तांत्रिक विषयांची पुस्तकेही हिंदीत येत आहेत. येत्या काळात हिंदीला आणखी चांगले दिवस येतील.
- दामोदर खडसे, माजी अध्यक्ष हिंदी साहित्य अकादमी, साहित्यिक

Web Title: maharashtra news Hindi day special