'राज्यात उद्योगवाढीसाठी सुविधांची पायाभरणी'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई - राज्यात उद्योगवाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, दळणवळण साधनांची पायाभरणी झाली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या प्राथमिक विकासपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत पहिले टर्मिनल आणि एक रन-वे तयार होईल. ट्रान्सहार्बर लिंकचे कामही साडेचार वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया’सोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रोचे काम सुरू झाले असून पाच वर्षांत मुंबईकरांसाठी दुप्पट वाहतूक क्षमता निर्माण होईल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठांत विशेष अभ्यासक्रम तयार करून शिकवण्यात येईल. शहर विकासासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी एक हजार गावांमध्ये काम सुरू आहे. यासाठी राज्य सरकारने स्वयंसेवी संस्थेमार्फत ३०० युवकांना दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडियाअंतर्गत राज्यात बॅंकिंग, ऑटो मोबाईल, तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे. राज्यातील ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’अंतर्गत या कंपन्यांना राज्यात उद्योग उभारणी करण्यात सहकार्य मिळाले आहे, असे शिष्टमंडळाने आवर्जून नमूद केले.

या बैठकीला उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुंबई विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान, माहिती तंत्रज्ञान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: maharashtra news industrial growth in the state Maharashtra CM Devendra Fadnavis