विनोदी लेखन ही अवघड कला - डॉ. नारळीकर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मुंबई - विनोदी लेखन करणे ही सर्वांत अवघड कला आहे. ती फारच कमी लोकांना साध्य होते. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे त्यापैकी एक. त्यांचे लेखन वाचकाला खिळवून ठेवते. त्यांचे लेखन प्रसंगी डोळ्यांत पाणीही आणते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी व्यक्‍त केले. 

मुंबई - विनोदी लेखन करणे ही सर्वांत अवघड कला आहे. ती फारच कमी लोकांना साध्य होते. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे त्यापैकी एक. त्यांचे लेखन वाचकाला खिळवून ठेवते. त्यांचे लेखन प्रसंगी डोळ्यांत पाणीही आणते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी व्यक्‍त केले. 

आचार्य अत्रे यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात "आत्रेय'तर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यंदाचा आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार देण्यात आला. प्रकृती अस्वास्थामुळे हजारे या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. त्यांच्या वतीने राळेगणसिद्धीच्या सरपंच रोहिणी गाजरे यांनी पुरस्कार स्वीकारला. 

हजारे यांचा संदेश असलेली ध्वनिफीत या वेळी दाखवण्यात आली. त्यात हजारे म्हणाले, "अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत केलेल्या कामाचे मोल कुणीही करू शकणार नाही. त्यांच्या भाषणांचा प्रभाव लहान मुलांवरही पडत असे. त्यांचा "श्‍यामची आई' हा चित्रपट आजही लहान मुलांवर प्रभाव पाडतो. त्यांचे जीवन एका दीपस्तंभासारखे होते.' 

""अत्रे यांनी सर्व क्षेत्रांत छाप पाडली. त्यांच्या गुणांमुळे त्यांना आजही समाजात आदराचे स्थान आहे. त्यांचे लेखन विनोदीच नव्हे, तर भावस्पर्शीही आहे. सध्या देशात विचारभिन्नता ही समस्या नसून, विचारशून्यता ही आहे,'' असे मत गडकरी यांनी या वेळी व्यक्त केले.

महाराष्ट्र

पाच लाखांची गरज; मदतीसाठी पुढे येण्याचे दानशूरांना आवाहन औरंगाबाद - महाविद्यालयात शिकत असताना महाविद्यालयीन विविध उपक्रमांत...

03.54 PM

पुणे - ‘सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम’चे (एसआयटी) वरिष्ठ बातमीदार गोविंद तुपे यांना; तसेच ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे बातमीदार...

06.33 AM

मुंबई -शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारला नव्याने कर्ज घ्यावे लागणार असून, 20 हजार कोटींच्या कर्जासाठी केंद्र सरकारने राज्य...

04.48 AM