खंडोबाच्या चरणी परदेशी पाहुणे

खंडोबाच्या चरणी परदेशी पाहुणे

जेजुरी - परदेशी पाहुण्यांनी जेजुरीच्या खंडोबा गडाला भेट देत खंडोबाचे दर्शन घेतले. खंडोबाच्या दर्शनाने विदेशी पाहुणे भारावून गेले. त्यांनी गडावरील खंडा हातात धरून व कपाळी भंडारा लावून ‘खंडोबाचा येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष केला. 

कॅनडा, मलेशिया, आइसलॅंड, फ्रान्स, यूएसए, इंग्लंड आदी देशांतून पाहुणे जेजुरीत आले होते. या वेळी त्यांच्यासोबत  असलेले सुरेश आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोरावके यांनी त्यांना जेजुरी भेट घडवून आली. गडावरील तलवार विदेशी पाहुण्यांनी हाताने उचलून पाहिली. मंदिर व धार्मिक माहिती जाणून घेतली. विश्‍वस्त सुधीर गोडसे यांनी तलवारीचे प्रात्यक्षिक दाखवले.  विजयकुमार हरिश्‍चंद्रे यांनी त्यांना माहिती दिली.

या भेटीबाबत अँड्री नावाची तरुणी म्हणाली, ‘‘जेजुरीबद्दल ऐकून होते. येथील तलवारीची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून खूप आश्‍चर्य वाटले.’’ मायकेल (कॅनडा), कविता (मलेशिया), अँड्री (आइसलॅंड), सेल्वेन (फ्रान्स), विडीम (यूएसए), वैशाली (इंग्लंड) या विदेशी पाहुण्यांनी जेजुरी भेटीबद्दल आनंद व्यक्त करीत, भंडारा कपाळी लावून खरा सोन्याचा भारत पाहायला मिळाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

फ्रान्सच्या सेल्विन याने, ‘‘अशी जगातील अद्भुत आणि वेगळी तलवार मी प्रथमच बघतोय, पण मंदिरात याविषयी इंग्रजी माहिती फलक असल्यास आमच्यासारख्या पर्यटकांना याचा इतिहास सहज वाचता येईल,’’ असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com