विहिरीतील कोल्ह्याची दोन तासांनी सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

जुन्नर - भक्ष्याच्या शोधार्थ निघालेला कोल्हा वडज (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. १३) दुपारी विहिरीत पडला. दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. बिबट निवारा केंद्र व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे त्याला जीवदान मिळाले आहे.  

बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख व वनपाल कृष्णा दिघे यांनी सांगितले, की हा सुमारे चार वर्षे वयाचा कोल्हा रविवारी वडज येथील अनिल साळुंखे यांच्या शेतातील विहिरीत पडला. विहिरीत पडल्यानंतर बाहेर येता न आल्याने तो ओरडू लागला.  त्या आवाजाने साळुंखे यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना कोल्हा दिसला. याबाबत वनपाल कृष्णा दिघे यांना साळुंखे यांनी कळविले. त्‍यानंतर त्‍याची दोन तासांत सुटका करण्यात आली.