शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी

kisan sabha reaction on farmers strike
kisan sabha reaction on farmers strike

शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्याने संप मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, किसान सभेने या आश्वासनांबाबत समाधानी नसल्याचे स्पष्ट केले आङे. किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या संदेशात खालील मुद्दे स्पष्ट केले आहेत.

  • सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारसी अमलात आणा अशी संपाची मागणी होती.
  • मुख्यमंत्र्यांनी चर्चेत कोणाचे किती मर्यादेपर्यंत कर्ज माफ करणार हे स्पष्ट करण्यास नकार दिला. याबाबत समिती स्थापन करून पुढील चार महिन्यात हे स्पष्ट करू असे सांगितले. कर्जमाफी झालेली नाही.
  • स्वामिनाथन समितीची उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा या आधारावर किमान आधारभूत भाव देण्याची शिफारस व तिच्या अन्य कोणत्याही शिफारसी मान्य करण्यात आल्या नाहीत.
  • शेतकऱ्यांना पेन्शन देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
  • दुधाच्या भाववाढीचे आश्वासनही बेभरवशाचे आहे.
  • संप मागे घेऊ नका असे मी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांना वारंवार विनंती करत होतो.
  • आपण पुणतांब्याला ग्रामसभा घेऊ व त्यात निर्णय घेऊ म्हणून विनंती करत होतो.
  • संप मागे घेऊ नका, किमान आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व शेतकरी नेत्यांना व संघटनांना तरी विश्वासात घ्या, असे मी सांगत होतो.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत व शिष्टमंडळामध्ये अगोदरच सर्व ठरले असल्याची जाणीव बैठकीत होत होती.
  • पहाटे 3.45 वाजता किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ  अशोक ढवळे यांच्याशी फोनवर चर्चा करून मी वर्षा बंगल्यातून बाहेर पडत माध्यमांना सामोरे गेलो.
  • तडजोड किसान सभेला मान्य नसल्याचे आणि महाराष्ट्रातील लढाऊ शेतकऱ्यांच्या या ऐतिहासिक संपलढ्याशी विश्वासघात असल्याचे माध्यमांसमोर अगोदर जाहीर केले.
  • त्यानंतर शिष्टमंडळ व मुख्यमंत्र्यांनी संप मागे घेतल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. मी त्या पत्रकार परिषदेत सहभागी झालो नाही.
  • काहीच पदरात पडले नसताना संप मागे घेऊ नये असे किसान सभेचे ठाम मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com