कर्जमाफी योजनेसाठी 19 हजार कोटी रुपये मंजूर 

कर्जमाफी योजनेसाठी 19 हजार कोटी रुपये मंजूर 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 41 लाख शेतकऱ्यांसाठी 19 हजार 537 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने गुरुवारी 16 लाख 98 हजार रुपये, 110 शेतकऱ्यांच्या खात्यांसाठी पाच हजार 580 कोटी रुपये मंजूर केले. याशिवाय, "वन टाइम सेटलमेंट' योजनेअंतर्गत सहा लाख पाच हजार, 505 शेतकऱ्यांच्या खात्यांसाठी चार हजार 673 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण सुमारे 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांसाठी 14 हजार 864 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. "वन टाइम सेटलमेंट'च्या 4 हजार 673 कोटी रुपयांसह एकूण 19 हजार 537 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 

शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविल्यानंतर एकूण 77 लाख खातेधारकांकडून व पुन्हा आलेले अर्ज तसेच इतर त्रुटी दूर करून सुमारे 69 लाख अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com