लोणंदमधील महिलांची हस्तकला अमेरिकेत 

लोणंदमधील महिलांची हस्तकला अमेरिकेत 

मुंबई - घरकाम आणि शेतात राबणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना योग्य प्रशिक्षण आणि संधी मिळाली, तर त्या हम भी किसीसे कम नही, हे असे दाखवून देऊ शकतात. लोणंद भागातील (जि. सातारा) महिलांनी हे सिद्ध करणारी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी ज्यूट आणि काथ्या यांच्या संगमातून आणि हस्तकलेद्वारे तयार केलेल्या चष्म्याच्या कव्हरपासून चटईपर्यंतच्या उत्पादनांना थेट अमेरिकेत बाजारपेठ मिळाली आहे. प्रॉडक्‍ट डिझाईन इंजिनिअर आणि कानपूर आयआयटीमध्ये प्राध्यापक असलेल्या झुमकी अय्यंगार यांच्या मदतीने या महिलांनी ही भरारी घेतली आहे. 

झुमकी या मूळच्या पश्‍चिम बंगालच्या. त्यामुळे त्यांना ज्यूटपासून तयार होणाऱ्या वस्तूंबद्दल चांगलीच माहिती होती. पुढे त्यांनी ज्यूटला काथाची जोड देऊन नव्या उत्पादनाला जन्म दिला. पण, त्यांनी या संकल्पनेचा उपयोग अल्पशिक्षित, गरजू-कष्टाळू ग्रामीण महिलांना रोजगार मिळावा यासाठी उपयोग करण्याचा निश्‍चय केला. भारतीय कला परदेशात पोचावी, असाही हा उद्देशही त्यांचा होता. त्यातूनच साकारला ओहरना प्रकल्प. 

झुमकी यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राबद्दल विशेष आपुलकी आहे. या आपुलकीमुळेच त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतील लोकांसोबत विविध क्षेत्रांत काम केले आहे. त्यातूनच लोणंद भागातील ग्रामीण महिलांना रोजगाराचे साधन देण्याच्या उद्देशाने त्यांनी दीड वर्षापूर्वी 12 महिलांसोबत काम सुरू केले. 

महाराष्ट्रामध्ये कलेची परंपरा असली तरीही एम्ब्रॉयडरी वर्कची तेवढी ओळख येते नाही. त्यामुळे सुरवातीला ज्यूटपासून तयार केल्या वस्तूवर विशिष्ट प्रकारची कलाकुसर शिकवण्यासाठी मेहनत घेतली. पण, काही दिवसांतच या महिलांनी बंगाली कला अवगत केली. त्यानंतर त्यांनी स्वस्थ न बसता या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचा निर्धार केला. झुमकी यांचे उच्च शिक्षण हे अमेरिकेत झाले असल्याने त्यांना तेथील लोकांची आवड, व्यवसायाच्या संधी, बाजारपेठ यांची माहिती होती. त्याचा फायदा घेत त्यांनी ओहरनाचे उत्पादन गेल्या महिन्यांत भारताऐवजी अमेरिकेत लॉन्च केले. ओहरनात तयार झालेले चष्माचे कव्हर, टेबल रनर, टेबल मॅट, पाऊच, कोस्टर्स, बुकमार्क, पेनस्टॅन्ड, चटई या वस्तूंना उत्तम प्रतिसाद मिळाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com