जानकरांचा मोर्चातून काढता पाय 

जानकरांचा मोर्चातून काढता पाय 

नागपूर - पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी "मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास ठेवा', असा उल्लेख करताच मोर्चेकरी संतप्त झाले व भाषण रोखण्याचा प्रयत्न केला. मोर्चेकरी आक्रमक होत असल्यामुळे महादेव जानकर यांना काढता पाय घ्यावा लागला. 

राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे बुधवारी काढलेला मोर्चा नियोजित ठिकाणी पोचल्यानंतर दुपारच्या सत्रात महादेवराव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे व आमदार सुनील केदार मोर्चास्थळी आले. केदार व डॉ. महात्मे यांचे भाषण शांततेत पार पडल्यानंतर जानकर भाषणासाठी उभे राहिले. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच तुम्हाला न्याय देतील. त्यांच्यावर विश्‍वास ठेवा,' असे त्यांनी म्हणताच मोर्चेकरी संतापले. हातवारे करायला लागले. यामुळे जानकरांनी मध्येच भाषण थांबवले. 

मुख्य म्हणजे जानकर परतल्यानंतर मोर्चातील एकाने माईकचा ताबा घेतला आणि "समाजाचा प्रश्‍न पुढे करूनच ही मंडळी खासदार, मंत्री झाली आणि आता समाजाला विसरले. त्यांना पुन्हा इथे येऊ देऊ नका', असे आवाहन केले. गेल्यावर्षी धनगर समाजाच्या मोर्चातही असाच प्रकार घडला होता. त्या वेळी महादेव जानकर व डॉ. विकास महात्मे यांना मोर्चेकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. प्रचंड विरोधामुळे दोघांनाही मोर्चातून निघून जावे लागले. 

न्याय मिळेल 
भाषण सुरळीत झाले. कुणीही भाषण थांबविले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com