मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार

टीम ई सकाळ
शनिवार, 3 जून 2017

शेतकऱ्यांच्या संपामागे काँग्रेस-राष्ट्रवादी असल्याचा आरोप करणे हे पोरकटपणाचे लक्षण आहे. कर्जमाफी फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच का?' 'सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती.

मुंबई - संपाबाबत शेतकरी युद्धात जिंकला मात्र तहात हरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना गंडवलं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस आणि किसान क्रांती मोर्चातील सदस्यांमध्ये आज पहाटेपर्यंत झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर झाले. मात्र, त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या संपात फूट पडल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील व्यवहार अद्याप बंदच आहेत.

पवार म्हणाले, ''शेतकऱ्यांच्या संपामागे काँग्रेस-राष्ट्रवादी असल्याचा आरोप करणे हे पोरकटपणाचे लक्षण आहे. कर्जमाफी फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच का?' 'सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. शेतकरी युद्धात जिंकला मात्र तहात हरला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं आहे.''

मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनांचं गाजर- पृथ्वीराज चव्हाण
शेतकऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त शेतकऱ्यांना आश्वासनांचं गाजर दाखविण्यात आले. अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मागण्या मान्य झाल्याची केवळ वातावरण निर्मिती केली. स्वामिनाथन आयोगाचं काय केलं? केवळ शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतले लोक आंदोलनात दिसले नव्हते, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
ऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम
शेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी​
चोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​

मेनका गांधी रुग्णालयात दाखल​