दादा महिलांवर अन्याय होतोय; भाजप महिलांची अजित पवारांना साद

गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

राज्यात महिलांची तस्करी होतीय. यात काँग्रेसचे पदाधिकारी सामिल आहेत. दादा महिलांवर अन्याय होतोय. तुम्ही आम्हाला मदत करा. महिलांवरच्या अन्यायावर चर्चा झाली पाहीजे, अन्यथा हे सभागृह आम्ही चालू देणार नाही,' असा पावित्रा घेत भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवारांना भावनिक साद घातली.

मुंबई : 'राज्यात महिलांची तस्करी होतीय. यात काँग्रेसचे पदाधिकारी सामिल आहेत. दादा महिलांवर अन्याय होतोय. तुम्ही आम्हाला मदत करा. महिलांवरच्या अन्यायावर चर्चा झाली पाहीजे, अन्यथा हे सभागृह आम्ही चालू देणार नाही,' असा पावित्रा घेत भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवारांना भावनिक साद घातली.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच नियम 57 अन्वये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशोत्तराचा तास रद्द करून मंत्री प्रकाश मेहता व एमएमआरडीएचे संचालक राधेश्याम मोपलवार यांची चौकशी करण्याची मागणी करत चर्चेची मागणी केली. त्यावर विरोधी पक्षांची चर्चेची मागणी अमान्य करत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारला. त्याविरोधात विरोधी बाकांवरून हरकत घेत घोषणाबाजी सुरू केली. यावेळी भाजपच्या मनिषा चौधरी यांनी लातूरमध्ये महिलांची तस्करी करणारे रँकेट पकडले आहे. यावर चर्चा करणे गरजेचे त्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केली.

यावेळी विरोधक गोंधळ करत वेलमध्ये उतरले होते. मोपलवारांचा फोटो असलेल्या फलकावर 'काय वाट्टेल ते करा सरकार माझे काहीही माझे काहीही बिघडवू शकत नाही', असा मजकूर लिहलेला फलक हातात घेत वेलमध्ये उतरले. यामुळे अध्यक्षांना विधानसभा दहा मिनीटे तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरवात केली. विधानसभेत विरोधकांनी, 'प्रकाश महेता का उलटा चष्मा, मी मुख्यमंत्र्यांची दिशाभुल केली पण राजीनामा देणार नाही,' असा मजकूर लिहलेला फलक फडकवत घोषणाबाजी सुरूच ठेवली.

भाजपच्या मनिषा चौधरी यांनी मात्र आपला मुळ चर्चा लावून धरत चर्चेची मागणी केली. यावेळी मनिषा चौधरी म्हणाल्या, ''महिलांची तस्करी होतीय. यात काँग्रेसचे पदाधिकारी सामिल आहेत. दादा महिलांवर अन्याय होतोय. तुम्ही आम्हाला मदत करा. महिलांवरच्या अन्यायावर चर्चा झाली पाहीजे, अन्यथा हे सभागृह आम्ही चालू देणार नाही. अध्यक्ष महोदय आम्हाला न्या द्या.'' यावेळी भाजपच्या आमदारांनीही गोंधळ घालण्यास सुरवात केली. परिणामी विधानसभेचे कामकाज 10 मिनीट तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू होताच सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळे पुन्हा कामकाज 15 मिनीट तहकूब करण्यात आले.

सरकारनामावरील आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Maharashtra news marathi news Ajit Pawar talked about womens harassment