सरकार मराठीचा वापर विकिपीडियावर वाढविणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

मुंबई - भाषेचा वापर जितका जास्त तितके तिचे आयुष्य वाढत असते. मराठी भाषेतून अधिकाधिक माहितीची देवाणघेवाण झाली तरच तिचे आयुष्य वाढणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर त्याची धुरा सोपविण्यात आली आहे. मराठी विकिपीडियाचा वापर खूपच कमी प्रमाणात होत असल्याने सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी त्याचा वापर करावा यासाठी त्यावर नेमके लिखाण कसे करावे, माहिती कशी द्यावी याचे रीतसर प्रशिक्षणच दिले जाणार आहे. 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 1 जानेवारी ते 15 जानेवारी या काळात साजरा करण्यात येतो. त्या वेळी मंत्रालयातील सर्व विभागांतील निवडक अधिकारी, कर्मचाऱ्यांना यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक मराठी भाषा विभागाने काढले आहे. 2001 मध्ये सुरू झालेल्या "विकिपीडिया' या मुक्‍त ज्ञानकोषाच्या प्रकल्पात 288 भाषा सहभागी आहेत. त्याच्या विक्‍शनरी, विकिसोर्स, विकिकॉमन्स, विकिडेटा, विकिबुक्‍स, विकिव्हर्सिटी आणि विकिन्यूजलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

विविध प्रादेशिक भाषांनी विकिपीडिया समृद्ध होत आहे. मात्र मराठी भाषेत कुठल्या विषयावर माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याला मर्यादा असतात. कारण मराठी भाषेतून अधिकृत माहिती इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात आलेली नसते. मराठी भाषा टिकण्याबरोबरच ती समृद्ध करण्यासाठी या नवीन व्यासपीठाचा राज्य सरकारने वापर करायच ठरवले आहे. यासाठी मराठी विकिपीडियावर आपले खाते उघडून आपल्याला माहीत असलेली माहिती आपण त्यामध्ये टाकू शकतो. उदाहरणार्थ, गावाबद्दलची माहिती, लेख, कविता याविषयावरचे लिखाण करता येईल. जगभरातील लोकांपर्यंत मराठी पोचेल तर राज्यातील खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून माहिती उपलब्ध होणार आहे.

Web Title: maharashtra news marathi state government Wikipedia