"म्हाडा'ची सोडत 10 नोव्हेंबरला 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतींतील 819 सदनिकांच्या विक्रीसाठी 10 नोव्हेंबरला संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी दहाला हा कार्यक्रम होईल. या सोडतीची जाहिरात उद्या (ता. 15) म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्जदारांना शनिवार (ता. 16)पासून अर्जांची नोंदणी करता येईल. 

महारेरा, जीएसटी आणि मुंबईतील घरांच्या किमतींमुळे ही सोडत लांबणीवर पडली होती. अखेर या सोडतीला मुहूर्त मिळाला आहे. 

या सोडतीची माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज "म्हाडा'च्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटांसाठीच्या सदनिकांचा समावेश आहे. अर्जदारांची नोंदणी 16 सप्टेंबरला दुपारी दोनपासून सुरू होईल. अर्जदारांना 21 ऑक्‍टोबरपर्यंत रात्री बारापर्यंत अर्ज करता येईल. त्यांना 17 सप्टेंबर ते 25 ऑक्‍टोबर या कालावधीत बॅंकेत डीडी जमा करता येईल. यंदा प्रथमच अर्जदारांना एनईएफटी व आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. एनईएफटी व आरटीजीएसद्वारे चलननिर्मिती 17 सप्टेंबरला दुपारी दोन ते 23 ऑक्‍टोबरच्या रात्री बारापर्यंत करता येईल. एफईएफटी व आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी 17 सप्टेंबर ते 24 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असेल. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंगद्वारे भरण्यात येणारी अनामत रक्कम 17 सप्टेंबर ते 24 ऑक्‍टोबरपर्यंत स्वीकारली जाईल. 

Web Title: maharashtra news mhada