वीज कर्मचाऱ्यांना 13 हजार 500 रुपये 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मुंबई - दिवाळी सणानिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण आणि सूत्रधारी कंपन्यांतील सुमारे 77 हजार कर्मचाऱ्यांना 13 हजार 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. कंत्राटी कामगारांनाही सात हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

नागपूर येथील बिजलीनगर येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. बैठकीला तिन्ही कंपन्यांचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सचिन ढोले, विनोद बोंद्रे आणि सूरज वाघमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी ऊर्जामंत्र्यांनी सानुग्रह अनुदानाबाबतची घोषणा केली. 