मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई -  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्याची संख्या पाहता मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांवर 10 दिवस बंदी घालण्यात आली आहे. या बंदीतून जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. 

मुंबई -  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्याची संख्या पाहता मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांवर 10 दिवस बंदी घालण्यात आली आहे. या बंदीतून जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. 

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांची मुंबई-गोवा महामार्गावर रिघ लागते. अवजड वाहने अचानक बंद पडल्यास वाहतूक कोंडी होते. हे लक्षात घेऊन 25 ऑगस्ट ते 5 नोव्हेंबर या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असेल. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक (महामार्ग पोलिस) विजय पाटील यांनी सांगितले. सुसाट वाहने चालवणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पर्यायी मार्ग  
रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांनी कळंबोली-पळस्पे फाट्यावरून न जाता कळंबोली-पनवेल बायपास डी पॉईंट करंजाडे टोलनाका फाटा या पर्यायी मार्गाने जावे. तर कळंबोली वाकणला जाणाऱ्यांनी मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे-खोपोली-पाली वाकण या मार्गाने जावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्गात जाण्यासाठी पर्यायी मार्ग 
महामार्ग पर्यायी मार्ग 
कळंबोली-चिपळूण मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे-सातारा-उंब्रज-पाटण-कोयनानगर-कुंभार्ली घाट-खेर्डी-चिपळूण 
कळंबोली-हातखंबा मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे-सातारा-कराड-वाठार-मार्गे शाहुवाडी-आंबाघाट-साखरपा-हातखंबा 
कळंबोली-राजापूर मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे-सातारा-कराड-वाठार-आंबाघाट-लांजा-रत्नागिरी 
कळंबोली-कणकवली मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे-सातारा-कराड-कोल्हापूर रकांळा तलावाजवळून-गगनबावडा घाट-वैभववाडी-कणकवली 
कळंबोली-सावंतवाडी मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे-सातारा-कराड-कोल्हापूर-निपाणी-आंबोली घाट, सावंतवाडी 

महामार्ग पोलिसांचे दूरध्वनी 
नवी मुंबई: 27572298/27574928 
रायगड : 7447711110 
सिंधुदुर्ग: 0262-228200/0262-228614 
मुख्य नियंत्रण कक्ष: 9503211100/9503511100/ 9833498334/ 9867598675