दुसऱ्या दिवसाचेही कामकाज ठप्प

दुसऱ्या दिवसाचेही कामकाज ठप्प

नागपूर-  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज बंद पाडल्याने अधिवेशनाचा दुसरा दिवसही वाया गेला. विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही ‘फेकू सरकार...फडवणीस सरकार हाय हाय’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. विरोधक शांत बसत नसल्याने अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिक घेतली. आधी कर्जमाफी नंतर कामकाज, असा इशारा दिला. कपाशी, सोयाबीन आणि धानाला एकरी २५ ते दहा हजारांवर भाव देण्याची मागणी काल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरवात होताच हाच मुद्दा घेऊन विरोधकांनी अध्यक्षांसमोर घोषणाबाजीस सुरवात केली. त्यामुळे प्रथम दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर कामकाजास सुरवात होताच विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी करून गोंधळ घालायला सुरवात केली. त्यामुळे अर्ध्या तासासाठी सभागृह तहकूब करण्यात आले. पुन्हा एकदा कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी गोंधळ घातल्याने पंधरा मिनिटे आणि त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्याची घोषणा तालिका अध्यक्षांनी केली. 

जवळपास हीच परिस्थिती विधान परिषदेमध्येही होती. विरोधी पक्षाने कर्जमाफीच्या मुद्यांवर आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहाचे कामकाज दोनदा अर्ध्या-अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com