आमदार निवासात ‘आमदार’ दिसेनात

आमदार निवासात ‘आमदार’ दिसेनात

नागपूर - राज्य सरकारने बांधलेल्या आमदार निवासात आमदार दिसणे आता मुश्‍किल झाले असून, ते आता कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान झाल्याचे दिसून येत आहे.

नागपूर करारानुसार दरवर्षी विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात घेण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. नागपुरात अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदारांसाठी सिव्हिल लाइन्स परिसरात आमदार निवास बांधले आहे. या परिसरात तीन इमारती असून, यात जवळपास पावणेचारशे सदनिका आहेत. १९७२ मध्ये या नव्या आमदार निवासाचे बांधकाम झाले. यापूर्वी आमदार ‘सुयोग’ इमारतीमध्ये आमदार राहत होते. 

गेल्या काही वर्षांमध्ये मात्र आमदार निवासात आमदार येतच नाहीत. अधिवेशन काळात राज्यभरातून अनेक कार्यकर्ते नागपुरात येतात. आमदाराला भेटून आपली कैफियत मांडण्यासाठी ते आमदार निवासात जात होते. परंतु आता आमदारच आमदार निवासात नसतात. बहुतांश आमदार हॉटेलमध्ये राहणे पसंत करतात. आमदार निवास आता त्यांचे स्वीय सहायक किंवा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी गजबजलेले असते. 

शहरातील बहुतेक हॉटेल मंत्री व आमदारांनी बुक केली आहेत. काही वर्षांपर्यंत महिला आमदार आमदार निवासात वास्तव्याला राहत होत्या. महिला आमदारांसाठी आमदार निवासात वेगळा ब्लॉक आरक्षित राहतो. आता महिला आमदारांनीही आमदार निवासाऐवजी तारांकित हॉटेलमध्ये राहणे पसंत केल्याचे दिसून आले. आमदार निवासात फारशा सुविधा नसल्याने आमदार हॉटेलमध्ये राहणे पसंत करीत असल्याचे कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com