राणेंचा भाजपप्रवेश योग्य वेळी होणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - कोकण परिसरात भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पक्षात घेतले जाणार हे निश्‍चित आहे; मात्र केव्हा त्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेला समवेत घेऊन राज्यातील सरकार चालवायचे आहे. शिवसेनेच्या आक्रमकतेला चाप बसवण्याचे धोरण भाजपने आता स्वीकारले असले, तरी नारायण राणे हा अत्यंत स्फोटक विषय आहे. त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त त्यामुळेच योग्य वेळी ठरवला जाईल, असे निश्‍चित झाले आहे. 

नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नीतेश यांनी या संदर्भात पूर्णत: मौन बाळगले असले, तरी दोघांनाही भाजपप्रवेशाची घाई झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्येक मतदारसंघाकडे लक्ष देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनात जेथे शक्‍ती नाही तेथे बाहेरच्या मंडळींना प्रवेश देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार राणे यांना घेणे निश्‍चित आहे; मात्र राणे यांना त्यासाठी मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार आहे.